Pune ACP, PI Transfer | पुणे: सहायक पोलीस आयुक्त (ACP), वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या (Sr PI) बदल्या

पुणे : Pune ACP, PI Transfer | पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar IPS) यांनी सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील (Sardar Patil ACP) यांची बदली सहायक पोलीस आयुक्त मानव संसाधन विभाग, पुणे शहर येथे करण्यात आली आहे. तर, सहायक पोलीस आयुक्त मानव संसाधन विभाग, पुणे शहरचे भाऊसाहेब पटारे (Bhausaheb Patare ACP) यांची बदली सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग येथे करण्यात आली आहे.
वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे (Sr PI Manoj Shedge) यांची नियंत्रण कक्षात (Pune Control Room) बदली करण्यात आली असून नियंत्रण कक्षातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे (Sr PI Vishvajeet Kaingade) यांची वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) बदली करण्यात आली आहे.