Hadapsar Pune Crime News | नशा करण्यासाठी वापरले जाणाऱ्या मेफेन्टरमाइन सल्फेट इंजक्शनची विक्री करणारी महिला जाळ्यात; 160 बाटल्या हस्तगत

पुणे : Hadapsar Pune Crime News | हडपसर परिसरात नशा करण्यासाठी वापरले जाणारे मेफेन्टरमाइन सल्फेट (टर्मीन) (Mephentermine Sulfate Injection) इंजेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करणार्या महिलेला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून १ लाख रुपयांची मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन)च्या १६० बाटल्या जप्त केल्या आहेत.
अंबिका ऊर्फ नेहा आनंदसिंग ठाकुर Ambika alias Neha Anandsingh Thakur (वय २६, रा. माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला हे औषध नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन ४०० ते ५०० रुपयांना विक्री करत होती.
तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे (API Arjun Kudle) यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक महिला नशा करण्यासाठी इंजेक्शनची विक्री करीत आहे. त्या माहितीवरुन हडपसर पोलिसांनी अंबिका ऊर्फ नेहा ठाकूर हिला छापा घालून पकडले. ठाकूर हिच्याकडे कोणताही औषध विक्रीचा परवाना नसताना हे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसताना, हे औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्लाशिवाय वापरल्यास व व्यक्तीस टोचलयास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन, औषध घेणार्या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते, हे माहिती असताना नशा करण्यासाठी गैरवापर करणाच्या उद्देशाने बेकादेशीररित्या विक्रीकरता मोठ्या प्रमाणात बाळगल्याने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अर्जु कुदळे हे तपास करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे, अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, निलेश किरवे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, कुंडलिक केसकर, अमोल दणके, गायत्री पवार यांनी केली आहे.
रक्तदाब वाढविण्यासाठी वापरले जाणारे औषध
मेफेन्टरमाइन सल्फेट (टर्मीन) ३० एमजी इंजेक्शन याचा वापर कमी रक्तदाब असलेल्यांचा रक्तदाब वाढविण्यासाठी केला जातो़ हे इंजेक्शन शिरा, स्रायू तसेच तोंडाद्वारे हळूवारपणे प्रशिक्षित परिचारिका, डॉक्टरांकडून दिले जाते. हे इंजेक्शन घेतल्यानंतर तुमच्या नसा अकुंचित पावतात. त्यामुळे ह्दयाची पंपिंग क्षमता वाढून रक्तदाब वेगाने वाढवते. गर्भवती स्त्रीया, स्तनपान करत असणार्या स्त्रीयांनी हे औषध घेऊ नये. तसेच गंभीर नैराश्यावर उपचार घेत असेल तर हे औषध घेताना काळजी घ्यावी. या इंजेक्शनमुळे उच्च रक्तदाब, चिंता आणि निद्रानाश यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात.