Dharashiv Crime News | धक्कादायक ! सरपंचाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Attempt To Murder Of Sarpanch

धाराशिव : Dharashiv Crime News | बीड मधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली. संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूर पद्धतीने आणि हालहाल करून त्यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच तुळजापूर मधून सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. (Attempt To Murder Of Sarpanch)

नामदेव निकम हे मेसाई जवळगा या गावाचे सरपंच आहेत. त्यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा हल्ला सुद्धा पवनचक्की वादातून झाला असल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात सरपंच नामदेव निकम आणि त्यांचा भाऊ जखमी झाला आहे. गाडीच्या काचा दगडाने फोडून, पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रात्री १ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे.