Wagholi Pune Crime News | पुणे: भरदिवसा टोळक्याने बाजारतळावर कोयत्याने तरुणावर वार करुन माजविली दहशत

पुणे : Wagholi Pune Crime News | वाघोली आव्हाळवाडी रोडवरील बाजारतळाजवळ भर दिवसा टोळक्याने येऊन तरुणावर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन त्याला गंभीर जखमी केले. हवेत शस्त्रे फिरवत आरडाओरडा करुन दहशत माजविली. (Attempt To Murder)
याबाबत अदित्य दीपक कांबळे (वय १८, रा. वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ओम दादाराव मस्के (वय १९, रा. दुबेनगर, वाघोली) याला अटक केली आहे. त्याचे साथीदार यश माणिक शिरसाठ (रा. आव्हाळवाडी), निखील कांबळे (रा. जे जे नगर, वाघोली), करण चव्हाण (रा. कटकेवाडी), प्रसाद मस्के, साहील राठोड, प्रथमेश श्रीखंडे व इतर दोघे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वाघोली आव्हाळवाडी रोडवरील बाजारतळाजवळ मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अदित्य कांबळे व त्याचा मित्र रोहन जाधव हे मोटारसायकलवरुन जात होते. त्यावेळी अचानक त्यांच्या पाठीमागून तीन मोटारसायकलवर आरोपी आले. ओम मस्के याने जुन्या भांडणाचा राग मनात धरुन हातातील कोयत्याने फिर्यादीच्या खाद्यांवर वार करुन त्याला गंभीर जखमी केले. इतरांनी फिर्यादीचा पाठलाग करुन शिवीगाळ करत धमकी दिली. हातातील शस्त्रे हवेत फिरवत दहशत निर्माण करुन मोठमोठ्याने आरडाओरडा करत पळून गेले. पोलीस हवालदार मोराळे तपास करीत आहेत.