Shivaji Nagar Pune Crime News | पुणे: घटस्फोट झाल्याचे सांगून लग्नाच्या आमिषाने तरुणाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार

पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | घटस्फोट झाला असल्याचे खोटे सांगून लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) महिलेवर तरुणाने लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केला. त्यानंतर तिने तक्रार देत असल्याचे सांगितल्यावर तिने तक्रार करु नये, म्हणून त्याने या महिलेच्या बँक खात्यावर पैसे पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. (Rape Case Pune)
याबाबत एका ३२ वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिच्या ओळखीच्या मुंबईतील ३८ वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ८ मे २०२४ व १९ मे २०२४ रोजी घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपी सोबत एका मित्राच्या माध्यमातून पासपोर्टच्या कामानिमित्त ओळख झाली होती. त्यानंतर ते एकमेकांची खुशाली बाबत विचारपूस करु लागले. फिर्यादी यांनी आपला घटस्फोट झाल्याचे सांगितले. तेव्हा या तरुणानेही आपला घटस्फोट झाला असून सध्या आपण सिंगल असल्याचे सांगितले. त्यानंतर तो फिर्यादीला लग्नाबाबत आग्रह करुन लागला. हॉटेलमध्ये फिर्यादीच्या ईच्छेविरोधात जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. फिर्यादी यांनी त्याच्या विषयी पूर्ण माहिती विचारली असता त्याने आईसोबत रहात असल्याचे सांगितले. यु एस वरुन परत आल्यावर बोलू असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीसोबत काहीही संपर्क ठेवला नाही. तसेच फिर्यादीस ब्लॉक केल्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने फिर्यादीस भेटून मी तुझ्यासोबत खोटे बोललो, असे सांगितले. फिर्यादी यांनी त्याच्याविरोधात तक्रार करण्याबाबत बोलले असता त्याने फिर्यादीच्या अकाऊंटमध्ये पैसे टाकून आता माझ्याविरोधात तक्रार करु नको, म्हणून सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे (API Savita Sapkale) तपास करीत आहेत.