Manjri Pune Crime News | पुणे: पती-पत्नी, मेव्हण्यामधील भांडणे सोडविणार्‍यावर कोयत्याने वार

पुणे : Manjri Pune Crime News | पती पत्नी आणि मेव्हणा यांच्यात भांडणे सुरु असताना ती सोडविण्याचा प्रयत्न करणार्‍यावर पतीने कोयत्याने वार (Koyta Attack) करुन गंभीर जखमी केले. (Attempt To Murder)

याबाबत अभिजित भास्कर डोंगरे (वय ४८, रा. दुर्गामाता कॉलनी, महादेव नगर, मांजरी रोड, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रमोद गोपीनाथ धारवाडकर (वय ४०, रा. घुले वस्ती, मांजरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार घुले वस्तीत मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद धारवाडकर हे पत्नी व मेव्हण्याशी घराबाहेर भांडणे करीत होते, त्यावेळी त्याच्यातील भांडणे सोडविण्याचा अभिजित डोंगरे यांनी प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने प्रमोद धारवाडकर याने आपल्याकडील कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या हाताचे दंडावर जोरात वार करुन गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.