Cop Molesting Minor Girl In Lonavala | पुणे: धक्कादायक! ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच केले 5 वर्षाच्या चिमुरडीशी अश्लील चाळे

पुणे / मावळ : Cop Molesting Minor Girl In Lonavala | ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच ५ वर्षाच्या चिमुकलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार बुधवार (दि.२५) समोर आला आहे. या बाबत चिमुकलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात (Lonavala Gramin Police Station) फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सचिन वसंत सस्ते (Sachin Vasant Saste) या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. ही घटना विसापूर किल्ला परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाताळाची सुट्टी असल्याने पर्यटकांनी विसापूर किल्ल्यावर गर्दी केली होती. त्या ठिकाणी सस्ते हा ड्युटीवर होता. तिथल्याच एका हॉटेलमधून त्याने भाकरी घेतली आणि जेवण केले. त्या भाकरीचे बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला, तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या पाच वर्षीय चिमुरडीला सस्तेने पाहिले. लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले.
मुलीने विरोध केला त्यावेळी त्याने तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असे तो तिला म्हणाला. मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला त्यानंतर ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता, त्याच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.