Yerawada Pune Crime News | मी कधी तुझ्या पोटावर पाय दिला काय म्हणत एका ठोशात केले नाकाचे हाड फ्रॅक्चर; येरवड्यातील घटना

पुणे : Yerawada Pune Crime News | तरुणाने त्याला बाजुला बोलावून मी कधी तुझ्या पोटावर पाय दिला काय,” असे विचारुन तोंडावर, नाकावर बुक्क्यांनी, ठोशाने मारहाण करुन नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत गणेश देवरे (वय ४३, रा. अमरधाम हिंदु स्मशानभूमी, गुंजन चौक, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी धीरज रवींद्र गोगावले (वय २५, रा. रामनगर, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना येरवड्यातील अमरधाम हिंदु स्मशानभूमीच्या सिक्युरिटी केबीनजवळ रविवारी रात्री सव्वा अकरा वाजता घडली. (Marhan)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश देवरे हे अमरधाम हिंदु स्मशानभूमी येथे राहतात. धीरज गोगावले याने त्यांना तुझ्याकडे काम आहे, असे म्हणून त्यांना सिक्युरिटी केबीनजवळ बोलावले. गणेश देवरे तेथे गेल्यावर तो त्यांना म्हणाला, ‘‘मी कधी तुझ्या पोटावर पाय दिला काय,’’ असे विचारले. त्यावर देवरे यांनी तुम्ही काय बोलता हे मला समजले नाही, असे म्हणाले. तेव्हा त्यांचे काही एक ऐकून न घेता धीरज गोगावले याने त्यांच्या तोंडावर, नाकावर, हाताचे बुक्क्यांनी, ठोशांनी मारहाण केली. त्यात देवरे यांच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले. त्यांना जमिनीवर ढकलून देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे तपास करीत आहेत.