Loni Kalbhor Pune Crime News | पुणे : पूर्ववैमनस्यातून व्यावसायिकावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; लोणी काळभोरमधील घटना

पुणे : Loni Kalbhor Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून पोल्ट्री फॉर्ममध्ये शिरुन टोळक्याने व्यावसायिकावर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना लोणी काळभोरमधील वडाळे वस्तीत सोमवारी दुपारी चार वाजता घडली.

याबाबत विजय श्रीरंग काळभोर (वय ४६, रा. रायवाडी, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सोन्या ऊर्फ निखील घायाळ Sonya Alias Nikhil Ghayal (रा. लोणी स्टेशन, कदमवाक वस्ती) व त्याच्या ३ ते ४ साथीदारांवर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Attempt To Murder)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय काळभोर आणि निखील घायाळ यांच्यात पुर्वी भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन घायाळ याने फिर्यादी व त्यांचा भाऊ दीपक काळभोर हे शेतात असताना मोबाईलवर कॉल करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी हे शेतातील पोल्ट्री फॉर्मवर आले. तेव्हा मोटारसायकलवरुन सोन्या घायाळ व त्याचे तीन ते चार साथीदार आले. त्यांनी विजय काळभोर यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. त्यांच्यातील एकाने लोखंडी रॉडने फिर्यादीचे दोन्ही हातावर मारुन जखमी केले. इतरांनी तेथे पडलेले दगड फेकून मारल्याने फिर्यादीच्या दोन्ही पायाला मार ला़गला़. आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवून सोन्या घायाळचा हिसका बघीतला का? बघतोच एक एकाला असे म्हणाल्याने पोल्ट्री फॉर्मवरील कामगार घाबरुन लपून बसले. विजय काळभोर हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार (PSI Ratnadeep Birajdar) तपास करीत आहेत.