Bapu Pathare MLA | आमदार बापूसाहेब पठारे यांची पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत रस्ते पाहणी

वडगावशेरी : Bapu Pathare MLA | आमच्या मतदारसंघाचा रस्ते हाही एक मूलभूत प्रश्न आहे. अनेक वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष झाले असून, रस्त्यांची वाताहात झाली आहे. रस्ते चांगले असतील तरच विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी माझी धारणा आहे. पाहणीदरम्यान, अधिकारी वर्गाला रस्त्यांच्या विविध कामांसंबंधी सूचना दिल्या आहेत. येणाऱ्या काळात मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न आणि सोबतच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला असेल, असे यावेळी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले.
काल (ता.२४) सकाळच्या वेळी, पुणे महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे साहेब, कार्यकारी अभियंता संजय धारव साहेब तसेच पथविभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांसमवेत पठारे यांनी रस्त्यांची पाहणी केली. यात प्रामुख्याने, यात सातववस्ती येथील निर्मला कॉन्व्हेंट शाळेजवळील अर्धवट रस्ता, चौधरी वस्ती येथील रस्ता, चौधरी वस्तीच्या पाठीमागील गोडाऊन येथील रस्ता व पूल, फॉरेस्ट काउंटी गेट क्र. ०३ येथील रस्ता, फॉरेस्ट काउंटी गेट क्र.०८ येथील फुटपाथ, सर्व्हे क्र. ५६ नवीन भाजी मार्केट येथील रस्ता इ. रस्त्यांचा समावेश होता.
पाहणीदरम्यान, आमदार बापूसाहेब पठारे यांनी सदर रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंबंधी सूचना केल्या. पालिका अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यातील रस्ते एक ते दीड महिन्यात चालू करतील, असे आश्वासन यावेळी कॉन्ट्रॅक्टर व अधिकाऱ्यांनी दिले. तसे न झाल्यास, कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली जाई, असे अधीक्षक अभियंता यांनी यावेळी स्पष्ट केले.
सकाळी झालेल्या पाहणी नंतर पठारे यांनी महानगरपालिकेमध्ये जाऊन पथविभाग उपायुक्त अनिरूद्ध पावस्कर यांचीही भेट घेतली. भेटीदरम्यान, रस्त्यांच्या पाहणीसंदर्भातील मुद्दे स्पष्ट करत पुढील कार्यवाही सुरू करण्यासंबंधी पावले उचलावीत, असे सांगितले.
खराडीत आयटी पार्क असल्यामुळे दररोज ३ ते ४ लाख नागरिक कामासाठी येतात. सध्या अस्तित्वात असलेले रस्ते पुरेसे नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. भविष्यात होणाऱ्या आयटी पार्क कंपन्या व कंपन्यांमध्ये येणाऱ्या नोकरदारांसाठी सोयीस्कर असणारे प्रामुख्याने हे चार रस्ते पूर्ण केल्यानंतर खराडीतील तसेच पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल.