Traffic Change Due To Christmas In Camp Pune | ख्रिसमसनिमित्त कॅम्पातील वाहतुकीमध्ये केला जाणार बदल

पुणे : Traffic Change Due To Christmas In Camp Pune | ख्रिसमस सणानिमित्त पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी रोडवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्याकरीता २४ व २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यत वाहतूकीमध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येत आहे.

वाय जंक्शनवरुन एम जी रोडकडे येणारी वाहतूक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करुन ती कुरेशी मशिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.

इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक ही बंद करुन ही वाहतूक एस बी आय हाऊस चौक उजवीकडे वळून तीन तोफा चौक सरह लष्कर पोलीस ठाणे अशी वळविण्यात येणार आहे.

व्होल्गा चौकातून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.

इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळविण्यात येईल.

सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक ताबुत स्ट्रीट रोडमार्गे पुढे सोडण्यात येईल. वाहतूकीतील हे बदल २४ व २५ डिसेंबर रोजी तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (Amol Zende DCP) यांनी सांगितले.