Pune Police MCOCA Action | चुहा गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई ! तडीपार केले असताना अंमली पदार्थांची करत होते तस्करी

पुणे : Pune Police MCOCA Action | तडीपार केले (Tadipar Criminals) असतानाही शहरात प्रवेश करुन अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या चुहा गँगांच्या (Chuha Gang Katraj) चौघांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.

टोळीप्रमुख तौसिफ जमीर सय्यद ऊर्फ चुहा (वय २८, रा. जामा मस्जीदजवळ, संतोषनगर, कात्रज), सुरज राजेंद्र जाधव (वय ३५, रा. मंगळवार पेठ, ता. करमाळा, जि. सोलापूर), मार्कस डेव्हिड इसार (वय २९, रा. धानोरी), कुणाल कमलेश जाधव (वय २५, रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

तौसिफ जमीर सय्यद याला पुणे जिल्ह्यातून दोन वषार्साठी तडीपार केले होते. असे असतानाही तो आपल्या साथीदारांसह अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी २३ नोव्हेबरच्या रात्री कात्रज येथे आला होता. आंबेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार धनाजी पोपट धोत्रे यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी छापा घालून चौघांना पकडले. त्यांच्याकडे एक गावठी पिस्टल, एक जिवंत काडतुस, १५ ग्रॅम मॅफेड्रॉन, कोयता, डिजिटल वजन काटा, सुतळी, स्क्रु ड्रायव्हर असे दरोड्याचे साहित्य मिळून आले. सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत येरवडा तुरुंगात आहेत. टोळी प्रमुख तौसिफ ऊर्फ चुहा याने अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळे साथीदार घेऊन स्वत:ची संघटीत टोळी तयार करुन गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थांची खरेदी विक्री करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोडा प्रयत्न, दहशत माजविणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत. कोंढवा, कात्रज, संतोषनगर, मार्केटयार्ड व पुणे शहरात अंमली पदार्थांची खरेदी विक्री करुन आर्थिक फायद्यासाठी तरुण मुलांना व्यसनाधीन करुन प्रसंगी त्यांना गुन्हेगारी टोळीमध्ये सामील करुन घेऊन गुन्हेगारी टोळी वाढविण्याचे काम करीत आहे. आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त प्रविण कुमार पाटील यांना सादर केला होता. पाटील यांनी याप्रकरणाची छाननी करुन या आरोपींवर मोक्का कारवाई करण्यास मान्यता दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, सहायक फौजदार चंद्रकांत माने, शैलेंद्र साठे, पोलीस हवालदार ढमढेरे, मासाळ, पोलीस अंमलदार जमदाडे, सावंत, धोत्रे, भोसले, जगदाळे तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याकडील हवालदार विशाल वारुळे, पोलीस अंमलदार स्वप्नील बांदल यांनी केली आहे.