Ajit Pawar News | ‘हा आमदार रुसला त्याची समजूत काढा असं काहीच करावे लागणार नाही’ – अजित पवार

शिक्रापूर : (सचिन धुमाळ) – Ajit Pawar News | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुळापूर (Tulapur) येथे एका कार्यक्रमांमध्ये बोलत असताना आमदारांच्या नाराजी वरून आमदारांना खडे बोल सोनावल्याचे पाहायला मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याची चर्चा होत असतानाच अजित पवारांनी नाराज आमदारांना थेट सुनावले आहे. राज्यात महायुतीला 237 आमदारांचं स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे हा आमदार रुसला त्याची समजूत काढा असं काहीच करावे लागणार नाही अशा शब्दात छगन भुजबळ यांच्यासह इतर नाराज आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावले आहे.
मात्र तरीही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मी नाराजांचा मान सन्मान ठेवण्याचं काम आम्ही करू अशा काळजी आम्ही नक्की करू असे देखील अजित पवार म्हणाले.