Sunil Shelke MLA | मंत्रिपदाचा पत्ता कट झाल्याचं कारण काय? निकष काय होते? सुनील शेळकेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

मावळ : Sunil Shelke MLA | महायुतीचा मंत्रिमंडळ (Mahayuti Govt) विस्तार झाला. मंत्र्यांना खातेवाटपही करण्यात आले. यावेळी अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आला तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे दरम्यानच्या काळात अनेक नेते नाराज असल्याचे दिसून आले. मंत्रीमंडळ विस्तारावेळी काही नावे चर्चेत होती मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. तर पुण्यातील मावळ मतदारसंघात मावळ पॅटर्न मोडीत काढत विक्रमी मतांनी विजय मिळवलेले सुनील शेळके यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा पत्ता कट झाल्याचे कारण सांगितले आहे.

सुनील शेळके म्हणाले, ” पुणे जिल्ह्यात दोनच मंत्रीपद दिली जाणार होती. याची कल्पना मंत्रीपद विस्ताराच्या तीन दिवस आधीच मला अजित दादांनी दिली होती. संख्याबळानुसार राष्ट्रवादीला ११ किंवा १२ जागा मिळतील असे अपेक्षित होते. मात्र, १० जागा मिळाल्या. राज्याचा समतोल ठेवत असतानाच श्रेष्ठांना, युवकांना किंवा नवीन चेहऱ्यांना संधी देताना थोडक्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ अशा भागातील विस्तार करताना समतोल ठेवायचा प्रयत्न आम्ही करतो आहे असे पक्षाकडून सांगण्यात आले होते. पक्षाचा समतोल राखताना जो काही निर्णय होईल, तो मान्य करावा लागेल. हे सांगितल्यानंतर क्षणाचाही विचार न करता मी सांगितले की पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल

ते पुढे म्हणाले, ” पुणे जिल्ह्यात दोन मंत्रीपदे मिळाले. एक खाते अजित पवारांकडे आहे आणि दुसरे दत्तात्रय भरणे यांना दिले आहे. आता तिसरे खाते पुण्यालाच द्यायचे तर मग आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इतकी खाती नव्हती. यावेळी दहा मंत्रीपदे आणि इच्छुकांची संख्या जास्त होती. दहा मधून पुण्याला दोन अशा पध्दतीने दोन खाती आहेत, मात्र, इतर जिल्ह्यांमध्ये फक्त एक एक आहेत.

नाशिकला दोन आहेत, तिथे देखील तितके संख्याबळ आहे, आधीच पुण्याला दोन पदे मिळाल्यानंतर तिसरे पद मागणे आपल्याला उचित वाटत नाही. जो आता निर्णय झाला आहे, तो मान्य आहे. पुढच्या काळात कुठेना कुठे स्थान देतील”, असे सुनील शेळके यांनी म्हंटले आहे.