Madhuri Misal News | पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत माधुरी मिसाळ यांचे भाष्य; म्हणाल्या…

पुणे : Madhuri Misal News | महायुती सरकारचे (Mahayuti Govt) मंत्रिमंडळाचे खातेवाटप काल शनिवार (दि.२१) पार पडले आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. त्यानंतर आता पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे.
खातेवाटपानंतर आता सर्वत्र पालकमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात पालकमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरु आहे. पुण्याच्या पालकमंत्री पदी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) की अजित पवार (Ajit Pawar) कोणाची वर्णी लागणार? याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, पुण्याच्या पालकमंत्री पदावरून पर्वती मतदारसंघाच्या (Parvati Assembly) आमदार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भाष्य केले आहे. “पुण्याचे पालकमंत्री कोणतेही दादा झाले तरी मला आनंदच आहे. मी दोन्ही दादांचं काम पाहिलं आहे. दोन्ही दादांनी नेहमी मला मदत केली”, असे भाष्य माधुरी मिसाळ यांनी केले आहे. (Guardian Minister Of Pune)
पुण्यातील पर्वती मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मंत्री झाल्यानंतर माधुरी मिसाळ पहिल्यांदाच पुण्यात दाखल झाल्या आहेत. पुणे विमानतळावर रात्री एक वाजता माधुरी मिसाळ दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पेढे भरवून त्यांचे स्वागत केलं आहे.