Yewalewadi Pune Crime News | येवलेवाडीत सातव्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यु; ठेकदाराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune-Pollution

पुणे : Yewalewadi Pune Crime News | बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन लिफ्टच्या मोकळया डक्ट मध्ये पडून कामगाराचा मृत्यु झाला़ या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.

सनी केशरीनारायन सोनी (वय १९, रा. लेबर कॉलनी, येवलेवाडी) असे मृत्यु पावलेल्या कामगाराचे नाव आहे.

याबाबत त्याचे वडिल केशरीनारायन सोनी (वय ४१, रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन डॉ. दिनेशकुमार रामसमुज द्विवेदी (वय ३७, रा. पॅरामिड आशियाना, इनामदारनगर, येवलेवाडी, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना येवलेवाडी येथील पिरॅमिड कन्स्ट्रक्शन येथे २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडीत पिरॅमिड कन्स्ट्रक्शन साईटवर बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी सोनी यांचे कुटुंबिय कामाला आहे. सनी हा डॉ. दिनेशकुमार द्विवेदी याच्या हाताखाली काम करत होता. त्याने कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाय योजना न केल्यामुळे सनी सोनी हा इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन लिफ्टच्या मोकळया डक्टमधून खाली पडून त्याचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत़