Tamhini Ghat Bus Accident | तामिनी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर; आमदार बापूसाहेब पठारे यांची मागणी राज्य सरकारकडून पूर्ण

Tamhini Ghat Pune Accident

पुणे : Tamhini Ghat Bus Accident | नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी, वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून ताम्हिणी घाटात वडगावशेरी मतदारसंघातील एक कुटुंब व त्यांचे नातेवाईक लग्नासाठी जात असताना त्यांच्या खाजगी बसचा अपघात होऊन अपघातात ६ व्यक्ती मृत पावल्या असून २७ जण जखमी झाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

अपघातातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी व जखमी वर मोफत उपचार व्हावेत अशी मागणी विधानसभा अध्यक्ष यांच्या मार्फत सरकारकडे केली. अध्यक्ष यांनी ताबडतोब सरकारला तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे जाहीर केले.

आमदार बापूसाहेब पठारे (Bapu Pathare MLA) यांनी या अपघातात प्राण गमावलेल्या नागरिक बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अपघातात ६ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २७ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या नगरिंकावर उपचार सुरू आहेत अशी माहिती दिली.