Pune Crime News | तडीपारीचा भंग करुन शहरात आलेले दोघे गुंड पोलिसांच्या जाळ्यात

Tadipar

पुणे : Pune Crime News | पुणे जिल्ह्यातून तडीपार केले असताना त्याचा भंग करुन शहरात आलेल्या दोघा गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय सुनिल येवले (वय २३, रा. भेंडी चौक, कृष्णकुंज, आंबेगाव बुद्रुक) आणि ऋतिक दत्तात्रय चव्हाण (वय २२, रा. गोसावी वस्ती, कोथरुड) अशी या गुंडांची नावे आहेत. (Tadipar Criminal Arrest)

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (Smartana Patil IPS) यांनी अक्षय येवले याला १७ नोव्हेंबर २०२४ पासून २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. असे असताना तो शहरात पुन्हा आला होता. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार लहु सूर्यवंशी यांना याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने गुरुवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता आंबेगावातून भेंडी चौक येथून ताब्यात घेतले.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam) यांनी ऋतिक दत्तात्रय चव्हाण याला १५ नोव्हेबर २०२४ पासून पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून तडीपार केले होते. असे असताना तो तडीपारीचा भंग करुन शहरात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलीस अंमलदार हरीश गायकवाड यांना याची बातमी मिळाली. पोलीस पथकाचे गोसावी वस्ती जाऊन चव्हाण याला ताब्यात घेतले.