Lohegaon Pune Crime News | लोहगावात टोळक्याची दहशत ! तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, वाहनांची केली तोडफोड (Video)

Crime logo

पुणे : Lohegaon Pune Crime News | आठवड्यापूर्वी चहा उधार न दिल्याने पान शॉप चालकाला मारहाण करणार्‍या अक्षय सगळगिळे याच्या टोळीने गुरुवारी रात्री लोहगाव परिसरात तरुणांवर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथील ५ दुचाकी, रिक्षा, दुकानाचे काऊंटर यांची तोडफोड करुन दहशत पसरविली. (Vehicle Vandalism)

याबाबत संदिप नंदकुमार आढाव (वय ३५, रा. जाधवनगर, विश्रांतवाडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी निकेलश पाटील (वय २१, रा. खंडोबानगर) याला अटक केली आहे. अक्षय संजय सगळगिळे (वय २०, रा. संतनगर, लोहगाव) आणि एका अल्पवयीन मुलावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कलवड वस्ती येथील स्वामी समर्थ नगरमध्ये गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चहा उधारीवर न दिल्याने अक्षय सगळगिळे याने लोहगाव येथील पोरवाल रोडवरील करण पान शॉपमध्ये १२ डिसेंबर रोजी राडा घातला होता. दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी दिली. शॉपमधील सामानाची तसेच शेजारील अंडाभुर्जीच्या गाडीची तोडफोड करुन नुकसान केले होते. पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यातून जामीनावर सुटल्यावर त्याने पुन्हा राडा घातला.

फिर्यादी हे त्यांच्या दुकानासमोर मित्रासोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी हे टोळके तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना कोयत्याने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केले. फिर्यादीचे दुकान तसेच त्यांच्या दुकानाशेजारील ज्वेलर्सचा बोर्ड त्यांनी तोडला. तेथील ५ दुचाकींवर कोयता व दगडाच्या सहाय्याने नुकसान केले. तसेच धानोरी जकात नाका येथील क्रेटा कार, एक तीन चाकी रिक्षा व ३ दुचाकी गाड्यांचे नुकसान केले. कलवड वस्तीतील गणराज चौकातील केदारेश्वर मेडिकलचे काऊंटर, फ्रिजची काच फोडली. चायनीज सेंटरचे नुकसान केले. चायनीज सेंटरचे मालक सलीम बागवान व त्यांचा मुलगा अदियान बागवान यांना दगड फेकून मारुन जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करीत आहेत.