Bank Exam In Pune | पुण्यात बँकेच्या परीक्षेवेळी सर्व्हर डाऊन; विद्यार्थ्यांच्या गोंधळानंतर परीक्षा रद्द

पुणे : Bank Exam In Pune | चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Chandrapur District Central Cooperative Bank) २६१ लिपिक व ९७ शिपाई पदासाठी आजपासून तीन दिवस राज्यातील ९ जिल्हातील केंद्रांवर ४० केंद्रावर परीक्षा घेण्यात येत होती. यासाठी जवळपास ३३ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते.

मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागल्याने विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीतील डीसीएस टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला परीक्षा घेण्याचे काम देण्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात या परीक्षेला सहकार खात्याकडून तसेच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती देण्यात आली होती मात्र नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ही स्थगिती उठवली होती. त्यानुसार २१, २२ आणि २३ डिसेंबर रोजी ही परीक्षा जाहीर करण्यात आली होती.