Pune Weather News | पुण्यात हुडहुडी! यंदा महाबळेश्वर पेक्षा पुणे अधिक थंड, एनडीए परिसरात ७.५ तर शिवाजीनगर भागात ८.९ अंश तापमानाची नोंद

पुणे : Pune Weather News | यंदा महाबळेश्वर पेक्षा पुणे अधिक थंड झाले आहे. मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. उत्तरेकडे थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने अंदमानातील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यभरात कडाक्याची थंडी जाणवत आहे. (Pune Winter News)
दरम्यान शहराच्या पश्चिम भागातील एनडीए, कोथरूड, शिवाजीनगर, पाषाण, औंध, वारजे, कात्रज, हवेली भागात कडाक्याची थंडी पडलेली आहे. गुरुवारी एनडीए परिसरात सर्वांत कमी ७.५ अंश सेल्सिअस तर शिवाजीनगर भागात ८.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
गुरुवार (दि.१९) पुण्यातील एनडीए भागात ७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर हवेलीत पारा ७.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. याशिवाय माळीणमध्ये ८ अंश सेल्सिअस, शिरूरमध्ये ८.३ अंश सेल्सिअस, तळेगावमध्ये ८.५ अंश सेल्सिअस, शिवाजीनगरमध्ये ८.९ अंश सेल्सिअस, पाषाणमध्ये ९.१ अंश सेल्सिअस, दौंडमध्ये ९.३ अंश सेल्सिअस, नारायणगावात १० अंश सेल्सिअस, तर बारामती १०.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.
तसेच राजगुरूनगरमध्ये ११.२ अंश सेल्सिअस, लवासा ११.४ अंश सेल्सिअस, इंदापूरमध्ये १२ अंश सेल्सिअस, लोणावळ्यात १२.७ अंश सेल्सिअस, गिरीवनमध्ये १३.३ अंश सेल्सिअस, कोरेगांव पार्कमध्ये १३.८ अंश सेल्सिअस, तर मगरपट्टा १५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.