National Volleyball Tournament | राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी 26 डिसेंबर रोजी निवड चाचणी

पुणे : National Volleyball Tournament | ॲडहॉक कमिटी व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (Ad-Hoc Committee Volleyball Federation of India) यांच्यामार्फत ७ ते १३ जानेवारी २०२५ या कालावधीत जयपूर, राजस्थान येथे होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुरुवार दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी चंद्रशेखर आगाशे शारीरिक महाविद्यालय, गुलटेकडी, पुणे- ४११०३७ या ठिकाणी सकाळी ९ वाजता निवड चाचणी होणार आहे, अशी माहिती क्रीडा व युवक सेवा उपसंचालक युवराज नाईक यांनी कळविली आहे.
राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल या खेळ प्रकारातील अधिकृत एकविध खेळ संघटना कार्यरत नसल्याने भारतातील व्हॉलीबॉल खेळाच्या प्रसार व प्रचाराचे काम सुरळीत सुरु राहण्यासाठी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा ॲडहॉक समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रस्तावित राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड करण्याची जबाबदारी समितीस देण्यात आलेली आहे. त्या नुसार २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता पुरुष व महिला संघाची उपस्थिती घेण्यात येऊन सकाळी ९ वाजता निवड चाचणीला सुरुवात होईल.
निवड चाचणी दरम्यान निवास व भोजनाची व्यवस्था खेळाडूंनी स्वत: करावयाची आहे. जास्तीत जास्त व्हॉलीबॉल खेळाडूंनी या निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. नाईक यांनी केले आहे.