International Men’s Day | आंतरराष्ट्रीय पुरुष दिनातून पुरुषांविषयीच्या गैरसमजुतींना आव्हान; मी टू वी मिशन 2034 तर्फे आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा

पुणे : International Men’s Day | विविध गैरसमजुतींना आव्हान देणे, लिंग समानता सारख्या संस्कृतीचा प्रसार करत आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सहानुभूती, करुणा आणि आदर या मूल्यांचा प्रसार करण्यात आला.
मी टू वी मिशन २०३४ (Me to We Mission 2034) अंतर्गत जंगली महाराज रस्त्यावरील (JM Road Pune) क्लार्क्स इन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पराग ठाकूर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मिशनच्या संस्थापक संचालिका डॉ. प्रिया पारेख आणि संचालक देबर्शी चक्रवर्ती यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले. क्षमा भेदा आणि चंद्रकला पालम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान दिले.
कार्यक्रमात झालेल्या चर्चासत्रामध्ये सी.जी. वर्गीस, डॉ.सौरभ पाटील, चैतन्य देशपांडे, साधा माणूस चे सतीश काँजेंटी, डॉ श्वेता पोतदार सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या मिस्टर व्हिस्कर्स स्पर्धेत सुरेंद्र जोशी, शशांक पवार, मिलिंद राऊत विजेते ठरले. पुरुष मॉडेल्सचा गौरव करण्यात आला. ब्युटी ॲस्थेस्टीक्स,इथोस्की,एपीडर्मल लॅबोरेटरी, राधिका नाईकवडी, ट्रीका एनर्जी ड्रिंक यांचे कार्यक्रमाला सहकार्य मिळाले.
डॉ. प्रिया पारेख म्हणाल्या, , पुरुषत्वाच्या पारंपरिक कल्पनांना आव्हान देऊन आणि सकारात्मक उदाहरणे प्रस्थापित करून आपण समाजाला समावेशक आणि समानतेच्या दिशेने पुढे नेऊ शकतो.