Pashan Pune Crime News | पुणे: विरोधात जाणार्या तरुणावर टोळक्याने कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; पाषाणमधील शिवनगरमधील रात्री उशिराची घटना

पुणे : Pashan Pune Crime News | मित्रासह शेकोटी करुन गप्पा मारत असताना आलेल्या टोळक्याने विरोधात जातो, म्हणून कोयत्याने सपासप वार (Koyta Attack) करुन तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मित्रालाही मारहाण केली. (Attempt To Kill)
याबाबत सुमीत सुरेश क्षीरसागर (वय २०, रा. शिवनगर, सुतारवाडी, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी आदित्य दशरथ अवचरे (वय १९, रा. शिवनेरी पार्क, बालेवाडी) याला अटक केली आहे. एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन आहे. विल्लु राठोड व त्यांच्या २ ते ३ साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शिवनगर येथील बाळु कोकाटे यांच्या कार्यालयासमोर बुधवारी रात्री साडेदहा वाजता घडली. (Attempt To Murder)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचे मित्र हे बाळु कोकाटे यांच्या कार्यालयासमोर शेकोटी करुन गप्पा मारत होते. यावेळी दुचाकीवरुन विल्लु राठोड व त्याचे साथीदार आले. यावेळी एकमेकांकडे खुन्नसने पाहिले, या कारणावरुन राग येऊन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा टोळक्याने हातातील लोखंडी कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. तेव्हा फिर्यादी यांनी तुम्ही मला का मारत आहात, असे विचारले. त्यांनी तुम्ही अदित्य अवचरे याच्या विरोधात का जात आहात, असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यावर, हातावर, मनगटावर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच त्याचा मित्र सौरभ वाघमारे यालाही मारहाण करुन जखमी केले. पोलिसांनी अदित्य अवचरे याला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध चतु:श्रृंगी पोलीस घेत आहेत.