Kondhwa Pune Crime News | सराईत चोरट्याकडून 6 घरफोड्या, 4 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस; कोंढवा पोलिसांनी 3 लाखांचा माल केला जप्त

पुणे : Kondhwa Pune Crime News | कोंढव्यातील प्रतिभा सोसायटीतील (Pratibha Society Kondhwa) एका इमारतीमधील ४ फ्लॅट फोडल्याचा तपास करताना पोलिसांनी (Kondhwa Police) दोघा सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्यांच्याकडून घरफोड्याच्या सहा व वाहनचोरीचे ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. (Vehicle Theft Detection)

समीर ऊर्फ अल्फाज हनिफभाई शेख (वय १८, रा. सैय्यदनगर, हडपसर) आणि मह्या ऊर्फ महेश काशीनाथ चव्हाण (वय १९, रा. गाडीतळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. (Arrest In Vehicle Theft)

कोंढव्यातील प्रतिभा सोसायटी येथील एका इमारतीमध्ये ४ फ्लॅटमध्ये तिघा चोरट्यांनी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले होते. या आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार राहुल थोरात, विकास मरगळे, मयुर मोरे यांनी समीर शेख व महेश चव्हाण यांनी या घरफोड्या केल्याचे उघड केले. समीर शेख याला १४ डिसेंबर रोजी अटक करुन त्यांच्याकडून डिओ मोटारसायकल जप्त केली. हडपसर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल होता.

महेश चव्हाण याने घरफोडी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले असल्याची माहिती पोलीस अंमलदार अभिजित जाधव, गणेश चिंचकर, अक्षय शेडगे यांना मिळाली होती. न्यायालयाच्या परवानगीने महेश चव्हाण याचा ताबा घेण्यात आला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत कोंढवा येथील घरफोडीचे ६ गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून घरफोडी चोरीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १ लाख ३१ हजार ६४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आले. तसेच त्याच्याकडून चोरीचे चार मोटारसायकली एका एकूण ३ लाख ९ हजार ७९६ रुपयांचा माल जप्त केला आहे. त्याच्याकडून कोंढव्यातील ७ गुन्हे व हडपसर, पिंपरी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे १० गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे निरीक्षक रौफ शेख, सुरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, अभिजित जाधव, गणेश चिंचकर, अभिजित रत्नपारखी, राहुल थोरात, राहुल रासगे, विकास मरगळे, मयुर मोरे, अक्षय शेंडगे यांनी केली आहे.