Kagal Kolhapur Accident News | वडिलांसोबत महाविद्यालयात निघाली अन् अनर्थ घडला; दुचाकी घसरून 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

कोल्हापूर : Kagal Kolhapur Accident News | कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील १९ वर्षीय विद्यार्थिनीचा दुचाकी घसरून अपघात झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऐश्वर्या विनोद मिरजे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना बुधवार (दि.१८) सकाळी १० च्या सुमारास वड्डवाडी येथे घडली. या घटनेने पिंपळगाव मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या ही कागल येथील महाविद्यालयाकडे वडील विनोद मिरजे यांच्या दुचाकी मोफेड (क्र. MH-०९-GT-९१६७) वरुन जात होती. वड्डवाडीजवळ आल्यावर समोरुन मालवाहतूक करणारा टेम्पो आल्याचे पाहून विनोद मिरजे यांनी अचानक ब्रेक दाबला.
यावेळी दुचाकीवरील ताबा सुटल्याने मागे बसलेली ऐश्वर्या ही बसलेल्या स्थितीतच डांबरी रस्त्यावर डोक्यावर आपटली. गंभीर मार लागल्याने तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा मृत्यु झाला.