FIR On API Deepak Jadhav | गुन्ह्यात जप्त केलेली मोटार सोडविण्यासाठी 50 हजारांच्या लाचेची मागणी; API सह तिघांवर गुन्हा, दोघे ताब्यात; पोलीस दलात खळबळ

कोल्हापूर : FIR On API Deepak Jadhav | गुन्ह्यात जप्त केलेली मोटार सोडविण्यासाठी ५० हजारांची मागणी केल्याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्याचे (Gandhi Nagar Police Station) तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव (API Deepak Jadhav) यांच्यासह तिघांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur Bribe Case)

त्यात एका पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश आहे. दरम्यान लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने या प्रकरणी जाधवसह दोघांना ताब्यात घेतले आहे. लाच लुचपतच्या पोलीस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांनी गुरुवार (दि.१९) दुपारी ही कारवाई केली.

८ दिवसांपूवी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जाधव यांच्याकडून पदभार काढून घेऊन त्यांना पोलीस नियंत्रण कक्षात हजर होण्याचे निर्देश दिले होते. लाच मागितल्या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांवर झालेल्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.