Vishrantwadi Pune Crime News | गळ्यातील दागिने चोरटे हिसकावतात म्हणून मंगळसुत्र, मोहनमाळ बॅगेत ठेवली; चोरट्याने महिलेला खाली पाडून बॅगच पळविली

Molestation-Case

पुणे : Vishrantwadi Pune Crime News | लग्नात दागिने घातले़ तेथून बाहेर पडताना गळ्यातील दागिने चोरटे हिसकावून नेताना म्हणून तिने मंगळसुत्र, मोहनमाळ काढून बॅगेत ठेवली. दुचाकीवरुन जात असताना चोरट्यांनी महिलेच्या हातातील बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केल्यावर तिला खाली पाडून हातातील कापडी बॅग चोरुन नेली. त्यात सोन्याचे मंगळसुत्र, मोहनमाळ, मोबाईल असा ४ लाख १० हजार रुपयांचा ऐवज होता. हा प्रकार दिघीवरुन आळंदी रोडने (Alandi Road Dighi) जात असताना बोपखेल फाटाजवळ सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत धानोरीत राहणार्‍या ५० वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी या त्यांचे पतीसह नातेवाईकांच्या लग्नाला सोमवारी सायंकाळी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मोहनमाळ व मंगळसुत्र बॅगमध्ये घेऊन गेले होते. लग्नामध्ये मंगळसुत्र, मोहनमाळ घालून त्या वावरत होत्या. लग्न, जेवण करुन त्यांनी रात्री सव्वा नऊ वाजता मोहनमाळ, मंगळसुत्र पुन्हा काढून कापडी बॅगमध्ये ठेवले. त्या पतीसह दुचाकीवरुन दिघी वरुन आळंदी रोडने घरी जात होते. बोपखेल फाटाच्या पुढे वडाच्या झाडाजवळ रस्ता थोडा अरुंद असल्याने त्यांनी दुचाकी हळू केली. तेव्हा पाठीमागून मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातात धरलेली बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या पतीने दुचाकी थांबविली. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला. मोटारसायकलवरील चोरटे खाली उतरुन त्यांच्याकडे आले.

त्यांनी बँग घट्ट धरुन ठेवली असताना त्यांना खाली पाडून त्यांच्याकडील ४ लाख १० हजार रुपयांचे १० तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग जबरदस्तीन हिसकावून चोरटे पळून गेले. चोरट्यांनी पाळत ठेवून पाठलाग करुन ही चोरी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलीस निरीक्षक कांचन जाधव तपास करीत आहेत.