Sunil Kamble MLA | ससून रुग्णालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे मध्यवर्ती मदत व मार्गदर्शन केंद्र सुरु करा; आमदार सुनिल कांबळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मागणी

पुणे : Sunil Kamble MLA | पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात (Pune Cantonment Assembly) येणाऱ्या ससून रुग्णालयात असंख्य गोरगरीब रुग्ण उपचारांसाठी महाराष्ट्रभरातून दाखल होत असतात, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फॉर्म साठी लागणाऱ्या ससून शासकीय रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) वैद्यकीय अधीक्षक यांच्या सही शिक्क्यासाठी असंख्य रुग्णांची रांग त्याठिकाणी दैनंदिन पाहायला मिळते.
त्यामुळे ससून रुग्णालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे पुणे शहर व जिल्हा म्हणून एक मध्यवर्ती मदत व मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात यावे. जेणेकरून तेथे येणाऱ्या रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन व मदत होईल, अशी मागणी आमदार सुनिल कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.