Diamond Parks Lohegaon Pune | डायमंड पार्क्सच्या ख्रिसमस चॅरिटी ड्राईव्हद्वारे प्रेमाचा प्रकाश पसरविण्याचा उपक्रम

पुणे : Diamond Parks Lohegaon Pune | लोहगावच्या डायमंड पार्क्सने या ख्रिसमस निमित्ताने समाजाला सकारात्मकतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबवला आहे. १२ डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान, माहेर NGO सोबत सहकार्य करत, डायमंड पार्क्सने गरजू मुलांसाठी चॅरिटी ड्राईव्ह आयोजित केली आहे.

डायमंड पार्क्सच्या कोपा दि कोलिना या हिलटॉप रेस्टॉरंटमध्ये एक गिफ्ट बॉक्स ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये पार्क्सला भेट देणारे गेस्ट्स आणि कर्मचारी नवीन भेटवस्तू ठेऊन त्यांचा सहभाग नोंदवू शकतात. या वस्तू माहेर NGO मधील 3 ते 5 वयोगटातील मुलांना 24 डिसेंबर रोजी वितरित केल्या जातील. या चॅरिटी ड्राईव्हमुळे ख्रिसमस हा त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल.

ख्रिसमस कार्निव्हल :

21 ते 25 डिसेंबर दरम्यान, डायमंड पार्क्सच्या ख्रिसमस कार्निव्हलमध्ये वॉटर अॅट्रॅक्शन्स, ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज, स्वादिष्ट मेन्यू, कलाकारांचे परफॉर्मन्स, आणि सांताक्लॉजसोबत भेट अशी विविध आकर्षणं आहेत.

नवीन वर्षाची धमाल पार्टी :

31 डिसेंबर 2024 ला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी डायमंड पार्क्सने खास पार्टी आयोजित केली आहे, ज्यामध्ये डीजे म्युझिक, फायरवर्क्स, कॅम्पिंग, बोनफायर, आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येईल.