Anganwadi Sevika Suicide News | अंगणवाडी सेविकेची विहरीत उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

परभणी : Anganwadi Sevika Suicide News | पूर्णा तालुक्यातील बरबडी येथील अंगणवाडी सेविकेने गावाशिवारातील विहरीत उडी मारून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवार (दि.१६) दुपारी चार वाजता उघडकीस आली. वनिता रामराव शिंदे (वय-४३) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Parbhani Crime News)
बरबडी येथील अंगणवाडी सेविकेने सोमवारी दुपारी ४ वाजता शेतकरी बालाजी कुंडलिक शिंदे यांच्या शेतीतील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेची तक्रार अर्जुन रामराव शिंदे यांनी पूर्णा पोलिसात दिली. (Purna Crime News)
त्यानंतर पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, अमर चाऊस यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास अमर चाऊस करत आहेत.