Pune Shramik Patrakar Sangh | पुणे पुस्तक महोत्सवात वृत्तपत्र छायाचित्रकारांचे प्रदर्शन पाहता येणार; पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पुस्तक महोत्सवाकडून आयोजन

पुणे : Pune Shramik Patrakar Sangh | पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील वर्षभरातील घडामोडींचे विविध वृत्तपत्रांतील छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन पुणेकरांना पुणे पुस्तक महोत्सवात (Pune Book Festival) पाहता येणार आहे.
पुण्यातील गणेशोत्सव, विसर्जन मिरवणूक, ग्रामीण भागातील दुष्काळ, पूरपरिस्थिती, क्रीडा क्षेत्रातील घडामोडी असे विविध छायाचित्र पाहता येणार आहे. प्रदर्शनासाठी पुणे पुस्तक महोत्सव आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विशेष सहकार्य लाभले आहे.या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या हस्ते झाले. यावेळी बावनकुळे यांनी छायाचित्रकारांशी संवाद साधत, छायाचित्रांच्या मागची घटनेची माहिती घेतली आणि प्रोत्साहन दिले.
यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव, महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, सदस्य प्रसेनजीत फडणवीस, डॉ. संजय चाकणे, बागेश्री मंठाळकर आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन महोत्सवात येणाऱ्या नागरिकांना सकाळी १० ते रात्री १० या वेळेत पाहता येणार आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.