Pune Crime News | रात्रीच्या वेळी प्रवाशांची लुटमार करणार्‍या तडीपार गुंडासह दोन साथीदार जेरबंद; लष्कर पोलिसांची कामगिरी

पुणे : Pune Crime News | रात्रीच्या वेळी बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना मारहाण करुन लुटणार्‍या (Robbery Case) तडीपार गुंडासह (Tadipar Criminals) त्याच्या दोन साथीदारांना लष्कर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या दोन मोटारसायकली व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. (Vehicle Theft Detection)

छोट्या ऊर्फ अभिषेक शिवाजी आल्टे (वय २३, रा. बाबाजान चौक, कॅम्प), अमर विशाल खरात (वय १९, रा. साईबाबा मंदिरासमोर, कॅम्प), जयेश गणेश भिसे (वय १९, रा. लक्ष्मीमाता मंदिरामागे, काशेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Lashkar Police)

खासगी ट्रॅव्हल बसने लातूरहून पुण्यात आल्यानंतर फिर्यादी गांधी बसस्टॉपजवळ १५ डिसेंबर रोजी रात्री उतरले होते. पायी बसस्टॉपकडे जात असताना दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना मारहाण करुन त्यांचा मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला होता. तपास पथकाने चोरट्यांचा शोध घेऊन आल्टे व त्याच्या साथीदारांना पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता लष्कर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यातील दोन मोटारसायकल व मोबाईल असा ८० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. (Arrest In Vehicle Theft)

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, गुन्हे निरीक्षक प्रदिप पवार, पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे, ज्योती कुटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिर्डे, रमेश चौधर, सचिन मांजरे, लोकेश कदम, सागर हराळ, अल्का ब्राम्हणे, श्रीनिवास केंजळे, भगवान पाटोळे, रवींद्र कदम यांनी केली आहे.