Pisoli Pune Crime News | पुणे : कुत्री गुरगुरल्याने मालकाला मारहाण करुन केले जखमी; पिसोळीमधील सोसायटीतील घटना

पुणे : Pisoli Pune Crime News | लिफ्टसाठी वाट पहात असलेल्या सोसासटीतील सदस्यावर कुत्री गुरगुरली. त्याचा राग येऊन चौघांनी कुत्रीच्या मालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लहान मुलांची सायकलने मारुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत कृणाल विठ्ठल वासम (वय ३४, रा. सार्थक बेलवा सोसायटी, वाघवस्ती, पिसोळी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) केली आहे. त्यावरुन पोलिसांनी आशपाक तांबोळी, त्यांचे नातेवाईक वलीन खान व इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पिसोळीतील सार्थक बेलवा सोसायटीत १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वासम हे त्यांची कुत्री सिया हिला खाली फिरवून परत घरी घेऊन जाण्यासाठी लिफ्टच्या लॉबीमध्ये थांबले होते. त्यावेळी सोसायटीत राहणारे आशपाक तांबोळी आले. त्यांच्याकडे पाहून कुत्री सिया ही गुरगुरली. त्याचा राग मनात धरुन तांबोळी यांनी घाण घाण शिव्या दिल्या. फिर्यादी यांना समजावत असताना त्यांनी फिर्यादीच्या कानाखाली मारली. पार्किगमध्ये असणारी लहान मुलांची सायकल घेऊन येऊन फिर्यादी यांना मारली. त्यावेळी फिर्यादी यांनी उजवा हात पुढे केल्याने हाताला जखम झाली. त्यानंतर फिर्यादी लिफ्टच्या लॉबीमधील कट्यावर बसले होते. त्यावेळी तांबोळी यांच्या कुटुंबातील दोघांनी शिवीगाळ करुन त्यांना खाली पाडले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तांबोळींचा नातेवाईक वलीन खान हा तेथे आला. तो आशपाक तांबोळी याला म्हणाला की आण रे रॉड याला आता मारुन संपवून टाकू, असे म्हणून धमकी दिली. पोलीस हवालदार लोणकर तपास करीत आहेत.