Headmaster’s Unnatural Act With Minor | गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा ! मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य

कोल्हापूर : Headmaster’s Unnatural Act With Minor | शिष्यवृत्ती परीक्षा आणि केंद्रीय शाळा प्रवेश परीक्षांची तयारी करवून घेणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. प्रदीप कृष्णात नलवडे Pradeep Krunat Nalavade (वय-३३, सध्या रा- कसबा बीड, मूळ रा- धामोड, राधानगरी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Kolhapur Crime News)

यु. व्ही निवासी ॲकॅडमीच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार ८ डिसेंबरला घडला असून पिडीत मुलाच्या पालकांनी शनिवार (दि.१४) या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा बीड येथील बीडशेड फाटा येथे यु.व्ही. ॲकॅडमी आहे. या ॲकॅडमीत ९४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील २३ मुले आणि ६ मुली निवासी आहेत. ८ डिसेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास ॲकॅडमीतील मुख्याध्यापक प्रदीप नलवडे हा दुसऱ्या मजल्यावरील अभ्यासिकेत मुलांसोबत झोपला होता. त्यावेळी त्याने एका अल्पवयीन मुलाला त्याच्याकडे बोलावून घेऊन अनैसर्गिक कृत्य केले.

घाबरलेल्या मुलाने हा प्रकार आठवड्याने घरात सांगितला. त्यानंतर वडिलांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने मुख्याध्यापकास अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला बुधवारपर्यंत (दि. १८) पोलिस कोठडी मिळाली आहे. उपनिरीक्षक नाथा गळवे अधिक तपास करीत आहेत.

पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी मुख्याध्यापक नलावडे याची कसून चौकशी केली. आणखी काही मुलांचे लैगिक शोषण केले आहे का? याचा शोध सुरु आहे. मुलांना विश्वासात घेऊन याबाबतची माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या ॲकॅडमीमध्ये दोन महिला शिक्षिका आणि ३ शिक्षक काम करतात. यातील दोन शिक्षक निवासी असतात.