Chandan Nagar Pune Crime News | पैसे परत न दिल्याने मारहाण करुन मोटारसायकल, मोबाईल नेला काढून; दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल

पुणे : Chandan Nagar Pune Crime News | तरुणाकडे असलेले १२ हजार रुपये न दिल्याने दोघांनी मारहाण करुन मोटारसायकल, मोबाईल व २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. (Robbery Case)

याबाबत शरद दिलीप सराफ (वय ४७, रा. सावत नगर, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शेखर संभाजी राऊत (रा. आरोरा सोसायटी, प्रीतनगर संघर्ष चौक, चंदननगर) व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वाघोलीतील खांदवेनगर येथील अक्षय बार आणि खराडीतील सीटीव्हीस्टा येथे १५ डिसेंबर रोजी रात्री पावणेनऊ ते अकरा दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शेखर राऊत याचे शरद सराफ यांच्याकडे १२ हजार रुपये आहेत. शेखर यांनी हे १२ हजार रुपये परत मागितले होते. फिर्यादी शरद सराफ यांनी पैसे न दिल्याचे कारणावरुन त्यांनी शिवीगाळ करुन हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर खराडी येथील सीटीव्हीस्टा येथे रात्री ते पुन्हा भेटले. तेव्हा शेखर राऊत व त्याच्या मित्राने फिर्यादी यांची मोटारसायकल व मोबाईल व २०० रुपये असा ८० हजार २०० रुपयांचा माल जबरदस्तीने काढून घेऊन ते निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास करीत आहेत.