Sinhagad Road Pune Crime News | अल्पवयीन असल्यापासून गुन्हे करणार्‍या दोघांकडून दोन पिस्टल, काडतुस जप्त

Pistol

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | अल्पवयीन असल्यापासून गुन्हे करणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांकडून पोलिसांनी दोन गावठी पिस्टल व एक काडतुस जप्त केले आहे. (Pistol Seized)

साजन विनोद शहा Sajan Vinod Shah (वय १९, रा. धायरीगाव) आणि कुणाल शिवाजी पुरी (वय १८, रा. धायरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हा प्रकार धायरी येथील आंबाईदरा येथे रविवारी सायंकाळी साडेसात वाजता घडला.

याबाबत पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला हे सध्या नांदेड सिटी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते आपल्या सहकार्‍यांसह पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, दोघे जण आंबाईदरा येथे कोणाची तरी वाट पहात असून त्यांच्याकडे अग्निशस्त्र आहेत. या बातमीनुसार पोलिसांनी तेथे जाऊन दोघांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस आढळून आले.

दोघेही अल्पवयीन असताना त्यांच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी ही पिस्टल कोठून आणली, कशासाठी बाळगली होती, याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव करत आहेत