Pune Pimpri Chinchwad Crime News | भांडणात मध्यस्थी करुन सोडविल्याने मित्राने केले ब्लेडने वार

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | मित्राच्या भांडणात मध्यस्थी करुन ती सोडविली. भांडण सोडविताना मित्राच्या कानफाडत मारल्याच्या रागातून मित्राने तरुणावर ब्लेडने वार (Blade Stabbing) करुन जखमी केले.
याबाबत प्रशांत नागेश जाधव (वय २७, रा. कोकणेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी सागर शिंदे (वय २२, रा. प्रेमलोक कॉलनी, राजेवाडेनगर, काळेवाडी) आणि चेतन ऊर्फ सुजल कोरे (वय २०, रा. काळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काळेवाडीतील कोकणेनगर येथे २५ डिसेंबररोजी पहाटे दीड वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत जाधव आणि सागर शिंदे हे दोघे मित्र होते. सागर शिंदे आणि प्रशांत सोनवणे यांच्यात भांडणे सुरु होती. त्यावेळी प्रशांत जाधव याने मध्यस्थी करीत भांडण सोडविली. त्यावेळी प्रशांत याने सागर याच्या कानफटात मारली होती. त्याचा सागर शिंदे यांच्या डोक्यात राग होता. रविवारी पहाटे सागर शिंदे व चेतन कोरे हे प्रशांत जाधव यांच्या सांसायटीत गेले. त्यांनी फिर्यादीला बोलावले. सागर व चेतन हे प्रशांत जाधव याला म्हणाले की, “तुला लई माज आलाय काय? तू माझ्या कानफटीत का मारलीस. तुला आज सोडत नाही, तुझी विकेट टाकतो,” असे बोलून त्यांनी प्रशांत याला हाताने मारहाण केली. तसेच त्याच्या ओठावर, डोक्यात, गालावर, हाताचे मनगटावर ब्लेडने वार करुन जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक गुरव तपास करीत आहेत. (Wakad Crime News)