DCP Rajkumar Shinde | पुणे : परिमंडळ पाचच्या (Zone – 5) पोलीस उपायुक्तपदी राजकुमार शिंदे यांची नियुक्ती

Rajkumar Shinde

पुणे : DCP Rajkumar Shinde | पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्तपदी राजकुमार शिंदे यांनी नियुक्ती केली आहे.

परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त आर राजा (R Raja IPS) यांची पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभागात पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड विभागाचे अधीक्षक राजकुमार शिंदे यांची ऑगस्ट २०२४ मध्ये पुणे शहर पोलीस उपायुक्तपदी बदली झाली होती. पुण्यात हजर झाल्यानंतर त्यांना मुख्यालयाची जबाबदारी देण्यात आली होती.