Chandan Nagar Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; शारीरीक संबंधातून मुलगी 7 आठवड्याची गर्भवती

पुणे : Chandan Nagar Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) एका १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याने त्यात ही मुलगी ७ आठवड्याची गर्भवती असल्याचे समोर आले.
याबाबत चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार फिर्यादीच्या घराजवळ सप्टेंबर २०२२ ते ७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडला होता. (POCSO Act)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी १४ वर्षे ९ महिन्यांची आहे. त्यांच्या घराजवळ राहणार्या एका १६ वर्षाच्या मुलाने तिच्यावर प्रेम आहे, असे सांगून तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशी वारंवार शारीरीक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी ७ आठवड्याची गर्भवती राहिली आहे. ही बाब आईच्या लक्षात आल्यावर तिने फिर्यादी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील (PSI Ashwini Patil) तपास करीत आहेत. (Minor Girl Rape Case)