Wagholi Pune Accident News | डंपरची धडक बसल्याने सायकलस्वाराचा मृत्यु; वाघोलीतील उबाळेनगरमधील घटना

Accident

पुणे : Wagholi Pune Accident News | सोसायटीमध्ये दुध विक्रीकडून हातात सायकल घेऊन जात असलेल्या सायकलस्वाराला भरधाव डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ज्येष्ठाचा मृत्यु झाला.

इंद्रजीत निवृत्ती सरडे (वय ५८, रा. उबाळेनगर, वाघोली) असे मृत्यु पावलेल्यांचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा समाधान इंद्रजित सरडे (वय २०) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी डंपरचालक राजू पांडु चव्हाण (वय २४, रा. सुयोगनगर, भावडी रोड, वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात वाघोलीतील उबाळेनगर येथे गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजीत सरडे हे सोसायटीमध्ये दुध विक्री करुन घरी जात होते. त्यांनी हातात सायकल धरुन ते रस्त्याच्या कडेने पायी जात होते. यावेळी भरधाव आलेल्या डंपरने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यु झाला. पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करीत आहेत.