Viman Nagar Pune Crime News | पुणे: चहा उधार न दिल्याने गुंडाचा राडा ! कोयता भिरकावून पान शॉप, अंडाभुर्जी गाड्यांची तोडफोड

पुणे : Viman Nagar Pune Crime News | चहा उधारीवर न दिल्याने गुंडाने जीवे मारण्याची धमकी देऊन पान शॉप, अंडाभुर्जीच्या गाडीवरील साहित्याची तोडफोड केली. विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) या गुंडाला अटक केली आहे.

अक्षय संजय सगळगिळे (वय २०, रा. संतनगर, लोहगाव) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. अक्षय सगळगिळे याच्या टोळीवर तत्कालीन पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का कारवाई (Pune Police MCOCA Action) केली होती. रोहन चव्हाण यांच्या टोळीने बुधवार पेठेतील व्यावसायिकांना तलवारीचा धाक दाखवून लुटले होते. त्यात टोळीत अक्षय सगळगिळे याचा समावेश होता.

याबाबत विशाल कैलास पालखे (वय २२, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार लोहगाव येथील पोरवाल रोडवरील करण पान शॉपमध्ये १२ डिसेंबर रोजी सव्वा दहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा फिर्यादीच्या पान शॉपवर आला. त्याने चहा उधारीवर मागितला. फिर्यादी याने उधारीवर चहा न दिल्याने अक्षय याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. लोखंडी कोयता हवेमध्ये जोरजोरात भिरकावून मी इथला भाई आहे़ कुणाच्या बापाला घाबरत नाही़ कोणीमध्ये आला तर त्यांची खांडोळया केल्याशिवाय राहणार नाही, असा आरडाओरडा केला. फिर्यादी यांचे दुकानांचे काऊंटरवर कोयता मारुन शॉपमधील साहित्याचे नुकसान केले. त्यांच्या शेजारील गुंडु सुधाकर म्हस्के यांचे अंडाभुर्जी हातगाडीवरील अंड्याचे ट्रे फोडले. राईस फेकून दिला. लाईटचे बल्ब फोडले. तसेच फ्रीजवर कोयते मारुन नुकसान करुन परिसरामध्ये दहशत माजविली. सहायक पोलीस निरीक्षक चंदन तपास करीत आहेत.