Kings Kitchen Solutions कंपनीत भक्तीपूर्ण वातावरणात दत्त जयंती साजरी

एन.पी. न्यूज ऑनलाईन – Kings Kitchen Solutions | दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला सर्वत्र दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शनिवारी या निमित्ताने शहरातील विविध दत्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
Kings Kitchen Solutions या कंपनीत देखील मोठ्या भक्तीभावाने दत्त जयंती साजरी करण्यात आली. कंपनीचे मॅनेजर सुनील अग्रवाल यांनी सांगितले की, जागा घेतल्यानंतर औदुंबराचे झाड आले. त्यानंतर आम्ही येथे दत्त मंदिर उभारले. तेव्हापासून आम्ही दरवर्षी दत्त जयंती साजरी करतो. मंदिरात होणार्या आरतीसाठी भक्त आवर्जून उपस्थित राहतात. त्यानंतर प्रसाद वाटप करतो. यावर्षीपासून महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. श्रध्देने उभारलेल्या या मंदिरात येऊन भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील अग्रवाल यांनी केले.
दरम्यान आजच्या दिवशी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, तर गुरुमुळे गजकेसरी योग तयार होत आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी असून याच तिथीला दत्तात्रेय जयंतीही साजरी केली जाते. दत्तात्रेय जयंतीला अमृत सिद्धी योग आणि रोहिणी नक्षत्राचा गजकेसरी योगाचा शुभ संयोग असल्याने आजचे महत्त्वही वाढले आहे.