Shivaji Nagar Pune Crime News | जिल्हा न्यायालयाला बनावट टोनर्सचा पुरवठा करणार्‍या व्यंकटेश्वर इन्फोटेकवर गुन्हा दाखल

Cheating Fraud Case

पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | जिल्हा न्यायालयातील (Pune District Court) लेझर प्रिंटरसाठी ३० नवीन टोनर्सची मागणी नोंदविली असताना कंपनीने कॅनॉन कंपनीचे बनावट टिनर्सचा पुरवठा केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत जिल्हा न्यायालयाच्या वतीने उत्तम आनंदराव थोरात यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी व्यंकटेश्वर इन्फाटेक मंगलम ब्रेझा (Venkateswara Infotech Mangalam Brezza) या कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगर न्यायालयात २० जुलै ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा न्यायालयातील लेझर प्रिंटरचे एकूण ३० नवीन टोनर्स व्यंकटेश्वर इन्फोटेक मंगलम ब्रेझा या कंपनीकडून खरेदी करण्यात आले. टोनर्सची डिलेव्हरी न्यायालयातील नाझर कार्यालयात दिलेली होती. कॅनॉन कंपनीचे ३० टोनर्स खराब असल्याने पुन्हा संबंधित कंपनीला हे सर्व ३० टोनर्स परत करण्यात आले. कंपनीने नवीन टोनर्सची डिलेव्हरी केली. संगणक विभागास दुसर्‍यांदा प्राप्त झालेले ३० टोनर्सची तपासणी कॅनॉन कंपनीचे प्रतिनिधी रहीम यांनी केली. त्यात त्यांनी टोनर्स बनावट असल्याचे सांगितले. कंपनीने जिल्हा न्यायालयाला कॅनॉन एलबीपी १५१ डी डब्ल्यु या लेझर प्रिंटरचे एकूण ३० नवीन टोनर्स बनावट असल्याचे माहिती असताना जिल्हा न्यायालयाला डिलेव्हरी करुन फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे (API Sanjay Pandhre) तपास करीत आहेत.