Pune RTO News | ऑटोरिक्षांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरच्या पुन:प्रमाणीकरण तडजोड शुल्कात घट

पुणे : Pune RTO News | ऑटोरिक्षा इलेक्ट्रॉनिक मीटर्सच्या पुन:प्रमाणीकरणाची (कलिब्रेशन) वैधता संपल्यानंतर अथवा भाडे सुधारणेनंतर मीटरचे पुन:प्रमाणीकरणाच्या तडजोड शुल्कात घट करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या 3 ऑक्टोबर 2024 रोजीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा प्राधिकरणाचे सचिवांनी कळविले आहे.
मुदतीत मीटर कॅलीब्रेशन करून न घेतल्यास मुदत समाप्तीनंतर प्रत्येक एक दिवस विलंबासाठी किमान १ दिवस आणि एकूण कमाल परवाना निलंबन कालावधी १० दिवस राहणार आहे. परवाना निलंबनाऐवजी तडजोड शुल्काचा विकल्प घेतल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रूपये मात्र कमाल तडजोड शुल्क ५०० रूपयांपर्यंत असेल.
सर्व ऑटोरिक्षा चालक, मालक यांनी ऑटोरिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन व मीटर तपासणी 31 जानेवारी 2025 पर्यंत करुन घ्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.