FIR On ACP Mohsin Khan | पीएचडी स्कॉलर युवतीला लग्नाचं आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवले; ACP मोहसिन खान ‘गोत्यात’

ACP Mohsin Khan

कानपुर : FIR On ACP Mohsin Khan | पीएचडी स्कॉलर युवतीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी एसीपी मोहसिन खान यांच्यावर कल्याणपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागाकडून विशेष परवानगी घेऊन कलेक्टरगंज सर्कलमध्ये तैनात एसीपी मोहसिन खान डिसेंबर २०२३ साली आयआयटी कानपूरमधील पीएचडी स्कॉलर युवतीच्या संपर्कात आला होता. (Rape Case On ACP Mohsin Khan)

मिळालेल्या माहितीनुसार, मागील जून महिन्यात मोहसिनने स्कॉलर युवतीच्या मार्गदर्शनात पीएचडी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या युवतीने मोहसिनची मदत केली आणि त्याला मार्ग मिळाला. या दोघांमध्ये जवळीक वाढली तेव्हा मोहसिनने युवतीला प्रपोज केले. त्याचवेळी ब्रेकअपच्या विरहातून जाणारी पीएचडी स्कॉलर युवती मोहसिनच्या प्रेमात पडली.

मोहसिनचे आधीच लग्न झाले होते. त्याला एक मुलगाही आहे. परंतु युवतीला अविवाहित असल्याचे सांगून ओळख वाढवली आणि जेव्हा तो विवाहित असल्याचे कळले तेव्हा पत्नीला तलाक देणार असल्याचे युवतीला सांगितले. हे प्रकरण उघडकीस येताच मोहसिन खानला पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे.