Adiguru Charitable Trust Pune | आदिगुरू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने सिद्धयोगी अभिषेक वैरागी यांच्या सत्संग सत्राचे आयोजन

पुणे : Adiguru Charitable Trust Pune | आदिगुरू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने सिद्धयोगी अभिषेक वैरागी (Abhishek Vairagi) यांच्या सत्संग सत्राचे आयोजन ओंकार मेमाणे, सौरभ रिसबुड यांनी रविवार दि ८ नोव्हेंबर रोजी नारायण पेठेतील केसरीवाडा लोकमान्य सभागृहामध्ये केले होते. या सत्रास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
सिद्धयोगी अभिषेक वैरागी यांनी यज्ञाचे महत्त्व, दत्त नवरात्रीत केल्या जाणाऱ्या उपासना पद्धती, नामसंकिर्तन, योग यावर मार्गदर्शन केले. शिवाय अध्यात्मिक साधनांचे महत्त्व, सामाजिक व राष्ट्रीय भान वाढवण्यासाठी सर्वप्रकारच्या समाज बांधवांनी संघटित रहावे यावर प्रबोधन केले. सर्वांगिण प्रगतीसाठी ध्यान व शक्तिपातही संपन्न झाले.
या प्रसंगी आयोजकाच्या वतीने अभिषेक दादा वैरागी यांचा सत्कार भाजपाचे कार्यकर्ते योगेश शांडिल्य (तिवारी) Yogesh Shandilya-Tiwari यांच्या हस्ते करण्यात आला. मा. नगरसेविका गायत्री खडके यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन आदिगुरू ट्रस्ट व माती गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले.