Sindhudurg Murder Case | भालावल येथील तरुणाच्या डोक्यावर, पाठीवर जखमा असल्याने पोलिसांचा संशय बळावला; जुन्या वादातून खून केल्याची कबुली

Pune Pimpri Chinchwad Crime News | Pune: Man beaten to death by thugs in Bhumkar Chowk, Wakad, over an argument over urination

सिंधुदुर्ग : Sindhudurg Murder Case | भालावल-फौजदारवाडी येथील संतोष नारायण गुळेकर (वय-४६) यांचा मृतदेह संशयितरित्या आढळून आला होता. त्यांच्या डोक्यावर आणि पाठीवर जखमा असल्याने हा घातपात असल्याचा पोलिसांना संशय होता. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित चेतन परब याला अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत वादातून त्याने खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

मंगळवार (दि.१०) मंगळवारी संतोष हा राहत्या घराच्या पाठीमागील बाजूकडील पडवीत पायऱ्यांवर मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृतदेहावर पूर्णपणे मुंग्या होत्या. तो घरात एकटाच राहत असल्याने सुरुवातीला ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. ही घटना मंगळवारी उशिरा समजल्यानंतर त्याचा भाऊ पंढरीनाथ गुळेकर यांनी त्याच्या घरी धाव घेतली.

बांदा पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिस निरीक्षक विकास बडवे, उपनिरीक्षक सुनील पडवळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी.एम. पवार, हवालदार राजेश गवस यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह मंगळवारी उशिरा बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनासाठी आणण्यात आला.

बुधवारी सकाळी मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. मात्र मृत व्यक्तीच्या डोक्याला झालेली जखम ही लागलेली नसून कोणीतरी वार केला असा पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर बांदा पोलिसांनी भालावल येथे जावून माहिती घेतली असता मृत व्यक्तीच्या घरी घटना घडण्याच्या आदल्या दिवशी त्याचे काही मित्र हे दारू पार्टीसाठी रात्री एकत्र जमले होते.

यावेळी पोलिसांनी त्या मित्रांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी चेतन रवींद्र परब याने आपल्याकडून झालेल्या वादात खून झाल्याची कबुली पोलिसांना दिली. यावेळी त्यांच्या सोबत त्यावेळी उपस्थित असलेल्या सगळ्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे व अन्य कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

बुधवारी उशिरा पर्यंत बांदा पोलिस ठाण्यात अन्य संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. मृत संतोष गुळेकर याचा पुतण्या नितीन गुळेकर यांनी संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.