Vishrantwadi Pune Crime News | महिलेला पळवून नेलेल्या तरुणाला पोलीस ठाण्यात मारहाण करण्याचा प्रयत्न; पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Vishrantwadi Police Station

पुणे : Vishrantwadi Pune Crime News | महिलेला पळवून नेल्याच्या संशयावरुन पोलीस ठाण्यात तरुणाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडविल्यावर पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला अंमलदारांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करणार्‍यावर विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक पद्मराज रामराव गंपले (PSI Padmaraja Ramrao Gample) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रुपेश प्रल्हाद गयादीन (वय ४१), राकेश प्रल्हाद गयादीन (वय ३८, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात १० डिसेबर रोजी दुपारी १ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी येथील गयादीन कुटुंबियांकडून महिला बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती. दौंडमधील एकाविषयी संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी दौंडवरुन या तरुणाला आणले व चौकशी केली जात होती. त्यावेळी आरोपींनी या तरुणाला पोलीस ठाण्यात मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडविले. यावरुन आरोपींनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. महिला अंमलदाराना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्यामुळे पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.