Pune Pimpri Chinchwad Crime News | मित्राच्या भावाला झालेल्या मारहाणीचा जाब विचारल्याने तरुणावर दगडाने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | मित्राच्या भावाला झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर पेपर कटरने वार करुन दगडाने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)
याबाबत सागर अनिल शर्मा (वय २२, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नागेश मोहनराव लांडगे (वय २२, रा. मधुबन कॉलनी, सांगवी), बॉलर ऊर्फ किरण प्रभाकर गायकवाड (वय २३, रा. पिंपळे गुरव) यांना अटक केली आहे. ही घटना पिंपळे गुरवमधील सृष्टी चौक येथील रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र सचिन विजय सूर्यवंशी यांच्या भावाला आरोपींनी मारहाण केली होती. याविषयी जाब विचारण्यासाठी सागर शर्मा हा तेथे गेला होता. तेव्हा तू आमच्याशी मोठ्या आवाजात का बोलतोय या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. दोघांनी सागर शर्मा याला मारहाण केली. किरण गायकवाड याने त्याच्याजवळच्या पेपर कटरने सागरच्या खांद्यावर, छातीवर, गालावर, पाठीवार वार करुन गंभीर जखमी केले. नागेश लांडगे याने दगडने मारहाण करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.